PM Kisan | पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार? - Amhi Kastkar
Agriculture News in Marathi

PM Kisan | पीएम किसान योजनेचा अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार?

0
5/5 - (3 votes)

PM Kisan Latest Installment – पीएम किसान (PM Kisan) योजनेचा अकरावा हप्ता कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमीची आहे कि पीएम किसान योजनेचा अकरावा  लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केला जाणार आहे.

प्रधानमंत्री किसान (PM Kisan) योजनेचे आत्तापर्यंत १० हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. या योजनेच्या माध्यमातून  दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा केले जातात. त्यामुळे या योजनेतून आत्तापर्यंत पात्र शेतकर्‍यांना सुमारे 20 हजार रुपयांची मदत केली गेली असल्याचे समजत आहे.

पीएम किसान सम्मान निधि योजणेचा अकरावा हप्ता  कधी मिळणार याबाबत अनेकांना प्रश्न आहे, तर पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत, केंद्र सरकार दरवर्षी पहिला हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलै, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. डिसेंबर ते मार्चपर्यंतचे हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान येईल.

पीएम किसान (PM Kisan)  योजनेसाठी आता ‘हे’ कागदपत्र द्यावे लागेल ….

जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर अर्जदाराला शिधापत्रिका क्रमांक अपलोड करावा लागेल. याशिवाय PDF देखील अपलोड करावी लागणार आहे. आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता कागदपत्रांची PDF फाईल तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. यामुळे पीएम किसान योजनेतील फसवणूक कमी होईल. तसेच, नोंदणी करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.

पंतप्रधान किसान योजनेचे पुढीलप्रमाणे यादीत तुमचे नाव तपासा –  यासाठी प्रथम तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा. नंतर त्याच्या होमपेजवर तुम्हाला Farmers Corner चा पर्याय दिसेल. त्यानंतर शेतकरी कॉर्नर विभागात, लाभार्थी यादी पर्यायावर क्लिक करा.  मग त्यानंतर तुम्ही ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर तुम्ही Get Report’ वर क्लिक करा. यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करावी? जाणून घ्या 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी आपण घरून नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही PM Kisan संकेतस्थळावर https://pmkisan.gov.in/ वर जा. यानंतर Farmers Corner’ अंतर्गत ‘Beneficiary Status’वर क्लिक करा. यासाठी आपल्याकडे आपल्या शेताचा सातबारा, आधार कार्ड, मोबाइल नंबर आणि बँक खाते क्रमांक असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर आणि खाते क्रमांक यापैकी कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. हे केल्या नंतर तुम्हाला याचा लाभ मिळेल का याची माहिती मिळेल.  प्रधानमंत्री किसान योजना.

महत्वाच्या बातम्या –

shetkari1
Share via
Copy link