[ad_1]
पुणेः युध्दामुळे रशियावर (Russia-Ukraine War) आर्थिक निर्बंध लावल्यास इंधन आणि नैसर्गिक वायूचे (Fuel and natural gas) दर वाढतील. परिणामी सूत आणि कापड वाहतुक महाग होईल. तसेच युरोपियन देशांत कापड निर्मितीचा खर्च वाढेल. याचा थेट परिणाम या देशांच्या सूत आयातीवर होईल, असे जाणकारांनी सांगितलं.
हे ही वाचा – पोकरा, ‘मनरेगा’चे प्रस्ताव तयार करून सादर करा : पवार
रशिया आण युक्रेन युध्दामुळे जागतीक बाजारातील (International market) पडझड काही प्रमाणात थांबली. अमेरिका, भारतासह बहुतेक देशांतील बाजारांत सुधारणाही पाहायला मिळाली. मात्र वाढत्या ऊर्जा दराचा फटका बसत आहे. कच्च्या तेलाचे दर १०० डाॅलरच्या पुढे गेले. याचा स्टाॅक मार्केट, कमोडिटी बाजारावर परिणाम झाला. मात्र या परिस्थितीत ग्राहकांची खरेदी कमी होते आणि याचा थेट परिणाम कापड उद्योगावर (Textile industry) होतो, असे जाणकारांनी सांगितलं. कापडाची मागणी केवळ दर, कापूस आणि कच्च्या मालावर अवलंबून नसते. तर देशातील वातावरण आणि सुरक्षितता महत्वाची असते. हे घटक ग्राहकांच्या कापड खरेदीवर परिणाम करत असतात. परिस्थिती शांततापूर्ण असेल तर ग्राहक अत्यावश्यक वस्तुंशिवाय इतर वस्तूंवर जास्त खर्च करतात.
हे ही वाचा – सोयाबीन दराची मुसंडी रशिया, युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर विविध देश निर्बंध लावत आहेत. अमेरिका, यरोपियन संघ आणि युनायटेड किंगडमने रशियावर आर्थिक निर्बंध जाहिर केले. यामुळे कापड व्यापारात अडथळे निर्माण होतील. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचे दर वाढतील. रशिया या दोन्हींचा मोठा पुरवठादार आहे. जर्मनीसह यरोपियन देशांना रशियातून निर्यात होते. तसेच या परिस्थितीत डाॅलर मूल्य वाढण्याची शक्यता आहे. असे झाल्यास अमेरिकेतून आयात महाग होईल. पुढील काही दिवस तरी ही महगाई दिसेल, असं जाणकारांनी सांगितलं.
युरोपियन संघातील देश ऊर्जेसाठी रशियावर अलंबून आहेत. तसेच जर्मनीसह या देशांत भारतातून सूत निर्यात होते. ऊर्जा महाग झाल्यास येथील कापड निर्मितीही महागेल. याचा परिणाम देशातील सूतगिरण्यांवर होईल, असंही जाणकारांनी सांगितलं. देशात कापसाचे दर वाढलेले आहेत. दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून कमी पुरवठा होतोय.
व्हिडीओ पाहा –
विजयलक्ष्मी टेक्सटाईलचे अध्यक्ष वेलमुरुगन शनमुगम यांनी सांगितलं, की या महागाईचा फटका देशातील सूतगिरण्यांसह कापड उद्योगालाही बसू शकतो. नैसर्गिक वायूचे दर वाढल्यास कापड निर्मिती महागेल. असे झाल्यास ग्राहकांची खरेदी कमी होऊ शकते. त्यामुळे देशातूनही कापड निर्यात कमी होईल, असेही शनमुगम यांनी सांगितलं. मात्र जगातील महत्वाच्या देश एकमेंकावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळं हे निर्बंध किती काळ राहतील याबाबत शंका आहे.
इंधानाचे दर वाढल्यास वाहतुक महाग होईल. कापड उद्योगाला आवश्यक कच्च्या मालाची आयातही महाग होईल. तसेच देशातून सूत आणि कापड निर्यातीसाठीचाही खर्च वाढले. एकूणच कापडाचे दर वाढतील. याचा परिणाम शेवटी कापड उद्योगावरच होईल.
– विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना, इचलकरंजी.युध्दामुळं सुताची मागणी कमी झाली आहे. याचा परिणाम कापूस दरावर दिसून आला. कमाल दर काहीसे नरमले असून तेजी मर्यादीत झाली आहे. पुढील १५ ते २० दिवस ही स्थिती राहू शकते.
– वैभव दातार, अध्यक्ष, श्रीराम टेक्सटाईल्स, इचलकरंजी
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.