[ad_1]
माळीनगर, जि. सोलापूर : उत्कृष्ट नियोजन करत माळीनगर (ता. माळशिरस) येथील केशव थोरात या तरुण शेतकऱ्याने केळीच्या निडवा पिकाचे (तिसरे पीक) गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत त्याची आखाती देशात निर्यात केली आहे.
थोरात यांनी दोन एकरांत निडवा केळीचे उत्पादन घेतले. त्यातून त्यांना ५५ टन उत्पादन अपेक्षित आहे. निडवा केळी पिकाची निर्यात तशी तुरळक होते. मात्र अचूक नियोजन करत ३३ महिन्यांत एकाच क्षेत्रातील दोन एकर केळीची लागण, खोडवा व निडवा अशा तिन्ही पिकांचे त्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेतले आहे.त्यांच्याकडे लागण, खोडवा व निडवा केळीचे सध्या नऊ एकर क्षेत्र आहे. यापैकी त्यांच्या एकाच क्षेत्रातील दोन एकर लागण व खोडवा केळीची देखील निर्यात झाली होती. दोन एकर लागणीच्या पिकात त्यांनी ८० टन केळीचे उत्पादन घेतले होते. त्या वेळी लॉकडाउनचा मोठा फटका त्यांना या पिकास बसला होता. त्यामुळे त्यांना त्या वेळी निर्यातीस केवळ पाच ते साडेसात रुपये दर मिळाला होता, याच क्षेत्रातील खोडवा पिकाचे दोन एकरांत ६५ टन उत्पादन घेत त्यांनी सरासरी १२ ते साडेतेरा रुपये दराने केळीची निर्यात केली होती. निर्यातीच्या मापदंडानुसार केळीचा रंग व आकार असल्याने त्यांच्या दोन एकरातील निडवा केळीची निर्यात सध्या सुरू आहे.
थंडीच्या दिवसांत चिलिंग एन्जुरी टाळण्यासाठी केळीचे घड वर्तमानपत्राने आच्छादित केले. फण्यांची संख्या योग्य ठेवून आवश्यक त्या फवारण्या करत स्वतः फ्रूट केअर घेतल्याने चांगल्या प्रतीचे निर्यातक्षम उत्पादन मिळाले. रासायनिक व सेंद्रिय खतांच्या समतोल वापर केला. त्यामुळे निडव्यापर्यंत उत्पादन घेऊ शकलो.
– केशव थोरात, केळी उत्पादक, माळीनगर

[ad_2]
Source link