[ad_1]
कोल्हापूर | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आज रात्री ८ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आणखी ११ पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडलीय. १४१ प्राप्त अहवालापैकी ११९ निगेटिव्ह तर ११ अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (एकाचा दुसरा अहवालही पॉझीटिव्ह आला आहे.) तर १० अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण ९७७ पॉझीटिव्हपैकी ७४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २१६ पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिलीय. ११ पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा- ५, भुदरगड- १, गडहिंग्लज-२ नगरपरिषद क्षेत्रातील -३ रूग्णांचा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ९२, भुदरगड- ७७, चंदगड- १११, गडहिंग्लज- ११२, गगनबावडा- ७, हातकणंगले- १८, कागल- ५८, करवीर- ३०, पन्हाळा- २९, राधानगरी- ७३, शाहूवाडी- १८७, शिरोळ- १२, नगरपरिषद क्षेत्र- ९२, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-५९ असे एकूण ९५७ आणि पुणे -२, सोलापूर-३, मुंबई-४, नाशिक -१, कर्नाटक-७, आंध्रप्रदेश-१ आणि सातारा-२ असे इतर जिल्हा व राज्यातील २० असे मिळून एकूण ९७७ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण ९७७ पॉझीटिव्ह रूग्णांपैकी ७४८ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल असलेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २१६ इतकी आहे.
[ad_2]
Source link