[ad_1]
परभणी ः तेलबियांवर संशोधनासाठी हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (वनामकृवि) यांच्यात सोमवारी (ता. २२) हैदराबाद येथे सामंजस्य करार करण्यात आला.
कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. एम. सुजाता, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी करारावर सह्या केल्या. या वेळी विद्यापीठातील लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबू, डॉ. रत्नकुमार उपस्थित होते.
भारतीय तेलबिया संशोधन संस्था देशातील तेलबिया पीक संशोधनात अग्रगण्य संस्था आहे. या दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी, तसेच पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामंजस्य करार महत्त्वाचा ठरणार आहे. करारामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी जैवतंत्रज्ञान तसेच कृषी विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैदराबाद येथील विविध प्रयोगशाळेत संशोधनात्मक कार्य करता येणे शक्य होणार आहे.
संशोधनाला मिळेल चलना
विद्यापीठास्तरावरील तेलबिया पिकांच्या संशोधन कार्य अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने हा करार फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमार्फत एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील. तेलबियांपासून विविध मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान महिला बचत गट तसेच शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.

[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.