[ad_1]
काबूल ः गेल्यावर्षी अफगाणिस्तानची सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानने मुलींच्या शिक्षणात अडथळे न आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यावरून घूमजाव करत तालिबानने इयत्ता सहावीपुढील मुलींना शिक्षणसंस्थांत प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालिबानच्या (Taliban) अधिकाऱ्याने यासंदर्भात अधिकृत स्पष्टीकरण दिले.
हेही पाहा- जनावरांवरील उष्णतेचा ताण कसा कमी करावा?
तालिबानच्या या निर्णयामुळे मुलींना शाळांचे (school) दरवाजे खुले करण्यासह महिलांना सार्वजनिक ठिकाणी त्यांचे अधिकार बहाल करण्याचे आवाहन करणाऱ्या जागतिक समुदायाला धक्का बसला आहे. समुदायाने तालिबानच्या निर्णयाचा निषेध केला आहे.
हेही वाचा- शेणावरूनही ओळखा, जनावरांचे आरोग्य
अफगाणिस्तानच्या (Afganisthan) शिक्षण मंत्रालयाने नुकतेच एक निवेदन जारी करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र, शिक्षण मंत्रालयाकडून नव्या शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तालिबानने मंगळवारी(ता.२२) रात्री उशिरा हा अनपेक्षित निर्णय जाहीर केला.
हेही वाचा- हैद्राबादी बिर्याणीसाठी या मेंढीचे मटण वापरले जाते !
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता पुन्हा काबीज केली होती. तेव्हापासून इयत्ता सहावीपुढील शिक्षण घेण्यास विद्यार्थिंनीवर (Students) बंदी घालण्यात आली. यावर्षी काही विद्यापीठेही सुरू झाली. परंतु, सत्ता काबीज केल्यापासून तालिबानचे आदेश अनिश्चित राहिले आहेत आणि अफगाणिस्तानातील मूठभर प्रांतांनी सर्वांना शिक्षण देणे सुरू ठेवले आहे. बहुतेक प्रांतातील शिक्षणसंस्थांनी मुली व महिलांसाठी आपले दरवाजे बंद केले आहेत. देशाची राजधानी काबूलमध्ये मात्र शाळा व विद्यापीठे कोणत्याही अडथळ्यांशिवाय सलगपणे सुरू आहेत. धार्मिक वृत्तीने चालणाऱ्या तालिबान प्रशासनाला इयत्ता सहावीपुढील मुलींची नोंदणी केल्याने त्यांचा आधार नष्ट होण्याची भीती आहे.
[ad_2]
Source link